Home राज्य अंगणवाडी मदतनिसांना ८,००० रुपये मानधन… लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन...

अंगणवाडी मदतनिसांना ८,००० रुपये मानधन… लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता

0

अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भरीव वाढ केलेली आहे. अंगणवाडी सेविकांना १५,००० रुपये तर अंगणवाडी मदतनिसांना ८,००० रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारन घेतलेला आहे. यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील .त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे. याकरिता राज्यभर विशेष ४८६० शिक्षकांच्या पदांची निर्मितीही केली जाणार आहे.तर अंगणवाडी मदतनिसांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे. कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देखील देणार येणार आहे. DevaBhau@DF_