भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष “आनंद महिंद्रा” विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. बऱ्याचदा ते त्यांच्या पोस्टमधून व्यवसाय, आर्थिक व जीवन याबद्दल अनेक प्रेरणादायी तसेच अनेक कौतुकास्पद गोष्टी शेअर करत असतात. आनंद महिंद्रा नेहमीच नेटकऱ्यांच्या अनोख्या कौशल्याने प्रभावित होत असतात आणि खास पोस्ट शेअर करत असतात. तर आज त्यांनी एका तरुणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडीओ शेतातील आहे. व्हिडीओच्या सुरवातीला पहिल्यांदा ट्रॅक्टरचे नाव दाखवण्यात येते. ‘महिंद्रा 575 DI’ ट्रॅक्टरमध्ये दोन तरुण बसलेले असतात .त्यानंतर ट्रकमध्ये बसलेला तरुण महिंद्रा 575 DI ट्रॅक्टरवर खूप जास्त सामान असते त्यावेळी ट्रॅक्टर कशाप्रकारे धावतो याचा आवाज काढून दाखवतो आहे. तरुणाने कशाप्रकारे ट्रॅक्टरचा आवाज काढला एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून नक्की बघा.
Very cool. The kid has a tractor in his belly…( I only hope he wasn’t doing this because the engine wasn’t working! 🙂) pic.twitter.com/8AJpBCq5Ue
— anand mahindra (@anandmahindra) January 11, 2024