Tuesday, June 24, 2025

राज्यपाल करतो उमेदवारी करू नका, अमित शाह यांचे शिंदे गटाच्या नेत्याला आश्वासन

अमरावती लोकसभेबाबत राज्यात मोठी चर्चा झाली. येथे महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची मोठी चर्चा रंगली होती. शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे रिंगणात उतरतील अशी चर्चा होती. परंतु, भाजपने अपक्ष खासदार नवनीत राणा यांना भाजप प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिली. ज्यावेळी उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती त्या काळात आपल्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोन आला होता. त्यांनी त्यावेळी मला अमरावतीतून निवडणूक लढवू नये असं सांगितलं. त्यावेळी आपण येथे जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत ते निवडून येऊ शकत नाहीत असं आपण कळवलं. परंतु, ते आम्ही पाहू आपण काळजी करू नका. आपल्याला राज्यपाल केलं जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं असा मोठा खुलासा आडसूळ यांनी यावेळी केला आहे.
निवडणूक लढवण्याची इच्छा होती. परंतु, अमित शाहंच्या ऑफरनंतर आपण माघार घेतली. मात्र, गेली 20 महिन्यांपासून उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच आश्वासन देत आहेत अशी आठवणही यावेळी त्यांनी सांगितली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles