देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीतल्या अतिशय आलिशान क्रूझवर पार पडत आहे. अशातच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तारीख आणि स्थळ जाहीर झालेलं आहे. अनंत आणि राधिका यांचा लग्नसोहळा १२ जुलैला रोजी मुंबईतल्या बीकेसीमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे.
अनंत- राधिका यांच्या लग्नसोहळ्याची सुरूवात १२ जुलैपासून होणार आहे. शनिवारी, १३ जुलै रोजी हा नव दाम्पत्याला शुभ- आशिर्वादाचा कार्यक्रम असेल. तर रविवारी, १४ जुलै लग्नाचा ग्रँड रिसेप्शन सोहळा असणार आहे. हा संपूर्ण लग्नसोहळा हिंदू वैदिक पद्धतीने पार पडणार आहे. मार्च २०२४ मध्ये अनंत- राधिका यांचा पहिला प्री- वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये पार पडणार आहे. पहिल्या प्री- वेडिंग सोहळ्यामध्ये, हॉलिवूडसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. पहिला प्री- वेडिंग सोहळाही त्यांचा तीन दिवसांचा पार पडला होता.
सध्या इटलीच्या क्रूझवर अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा दुसरा प्री- वेडिंग सोहळा पार पडत आहे. हा प्री- वेडिंग सोहळा २८ मे ते १ जून दरम्यान पार पडणार आहे. या प्री- वेडिंग सोहळ्यासाठी अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री उपस्थित राहिली असून संपूर्ण बॉलिवूडला सध्या सुट्टी आहे. या इव्हेंटसाठी तब्बल ८०० मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. सेलिब्रिटी, बिझनेसमन, क्रिकेटर्स सह आदी वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले दिग्गज चेहरे उपस्थिती लावणार आहेत. अनंत- राधिकाचे दोन प्री- वेडिंग इतक्या दणक्यात झाले आता लग्न कशापद्धतीने होणार याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सध्या होत आहे.