राज्यातील अंगणवाडी सेविकांना राज्य शासनाच्या वतीने लवकरच ‘अॅड्रॉईड मोबाइल’ देण्यात येणार आहेत. या मोबाइलची किंमत ११ हजारांपर्यंत आहे.
राज्यात एक लाख ८ हजार अंगणवाडी सेविका असून त्यांना अनेक शासकीय कामे तसेच लहान मुलांची माहिती मोबाइलद्वारे वरिष्ठांना कळवावी लागते. त्यामुळे या कामासाठी शासनाच्या वतीने मोबाइल देण्यात यावेत अशी मागणी होती. ही मागणी आता पूर्ण होणार आहे.