अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी मागील ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. त्यांच्या संपाला आज ५२ दिवस झाले आहेत. मागण्यांबाबत वारंवार चर्चा होऊन देखील कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. यामुळे अंगणवाडी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत सरकार मागण्यांबाबत कोणताही तोडगा काढत नाही; तोपर्यंत संप मिटणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांची आहे. वाशीम येथे आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महिला या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मागण्यांबाबत निर्णय घेत नसल्याने सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अंगणवाडी सेविकांच्या संपाचा ५२ वा दिवस, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी…
- Advertisement -