मुंबई : अंगणवाडी सेविकांसंर्दभात मोठी बातमी आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर जाणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांकडून बेमुदत संप पुकारण्यात आलाय. तर येत्या २१ ऑगस्टला सरकार विरोधात मोर्चा काढणार असल्याचं समोर येत आहे. या मोर्चात २ लाख अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहेत. मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असल्याचं समोर येतंय.
यापूर्वी अंगणवाडी सेविकांनी डिसेंबर २०२३ मध्ये राज्यव्यापी संप केला होता. मानधनात दरमहा ५ हजार रूपये वाढ होईल, असं आश्वासन संबंधित प्रशासनाकडून देण्यात आलं होतं. परंतु अद्याप पगारवाढीसंदर्भात कोणतंही प्रस्ताव दिलेला नाही, त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आलीय. मानधनात वाढ करण्याचा निर्णय, कायदेशीररित्या ग्रॅच्युइटी देण्यात यावी, मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत.