Wednesday, April 30, 2025

Anganwadi Worker Strike:अंगणवाडी सेविकांचा १५ डिसेंबरला नागपूरला एल्गार

अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या ४ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन अद्यापही सुरूच आहे. दरम्यान आज राहुरी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. १५ डिसेंबरला राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचा मोर्चा नागपूर येथे धडकणार आहे.
मानधन नको वेतन द्या, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी गेल्या आठ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे अंगणवाडीतील बालकांना मिळणाऱ्या पोषण आहारावर परिणाम झाला आहे. या आंदोलनादरम्यान आज राहुरी तहसील कार्यालयावर शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मोर्चा काढत सरकार विरोधात जोरदार घोषणबाजी केली. अधिवेशन सुरू असतानाही सरकार अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका घेत नसल्याने १५ डिसेंबरला राज्यभरातील अंगणवाडी सेविका नागपूर येथे निदर्शने करणार आहेत. त्यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्यास मत्र्यांना विरोध करण्यासह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलाय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles