Friday, February 23, 2024

अंगणवाडी सेविकांचा संप… प्रदीर्घ लढ्यानंतर संपात तोडगा !

अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या नेत्यांची सचिव, महिला व बालविकास, अनुपकुमार यादव आणि महिला बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल व अन्य आधिकाऱ्यांसोबत विस्तृत मीटिंग झाली.

१) शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या साठी पेंशन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रीमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले. तसेच कृति समितीच्या वतीने पेंशन योजने बाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला.
२) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युईटी देण्याचे मान्य केलें.
३) मोबाइल तात्काळ देणार.
४) मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार.
५) संपकाळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले. तसेच सर्व कारवाई आदेश मागे घेणार. असे मान्य केले
६) संप काळ करोना काळातील राहिलेल्या दिवाळी व उन्हाळी सुट्टी मध्ये समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार.
७) १०वी पास मदतनिसांना सेविका पदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

वरील सर्व चर्चा सचिव आणि आयुक्त यांच्याशी झाली. कृती समितीला ही चर्चा आशा दायक वाटली. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिनांक ५/१२/२०२३ रोजी झालेल्या मीटिंग मधे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्या नंतर त्याचें अवलोकन करुन अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा विषय मंत्री मंडळात मांडण्यात येईल.
वरील परिस्थिती व शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच ग्रॅच्युइटी व पेन्शनचा महत्वाचा निर्णय होत असल्याने अंगणवाडी कर्मचारी कृति समिती आपला संप मागे घेत आहे. आजच्या बैठकीला एम. ए. पाटील, ॲड. निशा शिवूरकर, शुभा शमीम, दिलीप उटाणे, दत्ता देशमुख, सुवर्णा तळेकर, आप्पा पाटील, ॲड आरमायटी इराणी, ॲड. माधुरी क्षीरसागर हे कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles