माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पुन्हा सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या कथित वसुलीचा आरोप असून ते याच प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत. आता देखमुख यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुख यांनी ‘एक्स’ मीडियावर पोस्ट करत याबााबत माहिती दिली. त्यानंतर या पोस्टमधून अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अजिबात घाबरणार नसल्याचे म्हणत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. यावेळी धन्यवाद, देवेंद्र फडणवीस म्हणत देशमुखांनी त्यांच्यावर उपरोधिक टोला लागवला आहे.
अनिल देशमुख पोस्ट करत म्हणाले, ‘आज माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेलाय. जनतेचा कौल बघून देवेंद्र फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झालं आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता- न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे’.
https://x.com/AnilDeshmukhNCP/status/1831261223050170581?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1831260427571105842%7Ctwgr%5Eca363166c16a3fab607c4f76bb8d6305245b7cca%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fmumbai-pune%2Fcrime-bureau-investigation-files-one-more-fir-against-anil-deshmukh-in-corruption-case-vvg94