जनावरांच्या कानाला इअर टॅगिंग, बिल्ला मारून घेऊन पशुधन प्रणालीवर त्याची नोंद करणे आता बंधनकारक
पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम :वाळकीत पशुपालक ,व्यापारी शेतकरी वाहतूकदार यांना पशुसंवर्धन अधिकाऱ्याने केले मार्गदर्शन
नगर तालुक्यातील वाळकी येथे गुरुवार (दि. ६ ) रोजी महादेव मंदिर सभामंडपामध्ये पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुपालक, मालक व्यापारी शेतकरी वाहतूकदार यांच्या मेळावा आयोजित केला होता.मेळाव्यामध्ये जनावराच्या कानांना बिल्ला ,इअर टॅगिंग जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये करून घ्यावे. विना बिल्ला, टॅगिंग जनावराची खरेदी-विक्री वाहतूक केल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई कार्यवाही करण्यात येईल.असे यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, तसेच जनावराच्या जन्म मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषध उपचार वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतर करणे यामुळे सोपे होणार आहे. पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने जनावरांच्या कानांना बिल्ला, टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीवर त्याची नोंद करणे बंधनकारक असल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रसंगी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे,सहाय्यक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे,पशुधन विकास अधिकारी संतोष गायकवाड,सरपंच शरद बोठे,राम भालसिंग, विठ्ठल सुपेकर,डॉ.बाबा बोठे आदींसह पशुसेवक,पशुपालक, मालक,शेतकरी व्यापारी वाहतूकदार वाळकी ग्रामस्थमोठ्या संख्येने उपस्थित होत
जनावरास बिल्ला, इअर टॅगिंग करण्याचे फायदे
.पशुधनास पशुवैद्यकीय सेवा घेण्यासाठी.
.बिल्ला, टॅगिंग शिवाय जनावराची वाहतूक केल्यास जनावराच्या मालकावर व वाहतूकदारावर दंडात्मक कार्य होणार म्हणून.
.परराज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक करता येणार नाही.
.बिल्ला, टॅगिंग नसेल तर बाजार समित्या, आठवडे बाजार आणि गावागावातील खरेदी विक्रीस बंदी.
.बिल्ला, टॅगिंग नसेल तर शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही.
वाळकी (ता. नगर) येथे पशुपालक मालक, शेतकरी व्यापारी वाहतूकदार यांच्या मेळाव्यात जनावरांना बिल्ला, इअर टॅगिंग करून घ्यावे.याविषयी पशुसंवर्धन विभागाचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे यांनी मार्गदर्शन केले.
टॅगिंग न केल्यास जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही, पशुसंवर्धन विभागाची माहिती माहिती
- Advertisement -