Tuesday, February 18, 2025

८० आलिशान गाड्यांसाठी अजित पवारांकडे १५-१६ कोटी रुपये कुठुन आले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसाठी ८० गाड्यांचं बुकिंग केलं असल्याची बातमी अनेक वृत्तपत्रं आणि संकेतस्थळांनी प्रसिद्ध केली आहे. अजित पवार गटाने पदाधिकाऱ्यांसाठी ४० महिंद्रा स्कॉर्पियो आणि ४० महिंद्रा बोलेरो बूक केल्या आहेत, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांना कार भेट देण्याची घोषणा केली होती. आता ही घोषणा ते अंमलात आणणार आहेत. यासाठी महिंद्राच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांचं टेस्टिंग चालू आहे. काही गाड्या पक्षाच्या विधीमंडळाजवळच्या पक्ष कार्यालयात टेस्ट ड्राईव्हसाठी आणल्याचं सांगितलं जात आहे. या गाड्यांच्या खरेदीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे.

दमानिया म्हणाल्या, ४० स्कॉर्पिओ आणि ४० बोलेरो अशा एकूण ८० गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत. परंतु, या गाड्या कुठून आल्या? त्यासाठी इतके पैसे कुठून आले? एका महिंद्रा स्कॉर्पिओची किंमत २४.५० लाख रुपयांच्या आसपास आहे. तर बोलेरोची किंमत १३ लाख रुपये इतकी आहे. म्हणजेच या ८० गाड्यांसाठी १५ ते १६ कोटी रुपये खर्च केले आहेत. हे १५-१६ कोटी रुपये कुठून आले? कोणी दिले? अजित पवार यांनी स्वतः दिले की त्यांच्या पक्षाने दिले? मला एका गोष्टीची गंमत वाटते की, या सगळ्या गोष्टी ईडी (सक्तवसुली संचालनालय), एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) आणि निवडणूक आयोगाला दिसत नाहीत का?

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles