राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारं भाकित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. पुढील 30 दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडणार असून पुन्हा ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या आधीच होईल. काँग्रेसही फुटेल. या सगळ्या घडामोडी राम मंदिर सोहळ्याआधी किंवा नंतर घडतील, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली असून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. दमानिया यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली.
दमानिया पुढे म्हणाल्या, आता भाजप काँग्रेसही फोडणार. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षच उरणार नाही. अशा परिस्थितीत आम्हालाच विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागेल.