Thursday, September 19, 2024

केवळ गुलाबी जॅकेट घालून वल्याचा वाल्मिकी होत नसतो…अजितदादांवर टीका

गुलाबी कॅम्पेनवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात ट्वीटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नाही, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली तर गुलाबी जॅकेट घालून आणि बसेस फिरवून जन सन्मान होत नसतो, असे म्हणत अंजली दमानियांनी अजित पवार गटावर खोचक टीका केली आहे. ‘गुलाबी जॅकेट घालून, गुलाबी गाड्या आणि बसेस फिरवून, जन सन्मान होत नसतो. त्या जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशातून भरलेल्या कराचा अपव्यय न कारणे, भ्रष्टाचार न करणे हा हाईल जनतेचा खरा सन्मान. तो तुमच्यांनी या जन्मी शक्य होणार नाही. केवळ गुलाबी जॅकेट घालून वल्याचा वाल्मिकी होत नसतो.’ असं ट्वीट करून अंजली दमानिया यांनी अजित दादांवर टीका केली आहे. https://x.com/anjali_damania/status/1821582813973405867

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles