मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येचा ठपका असलेला वाल्मिक कराड याचे अनेक कारनामे समोर येत आहे. अंजली दमानिया यांनी सोशल मिडियावरती कागदपत्र शेअर केली असून बीडमधील वाईनच्या दुकानांसंदर्भात त्यांनी आरोप केले आहेत. यासाठी त्यांना मिळालेल्या एका पत्राचा उल्लेख अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.अंजली दमानिया यांनी आज (मंगळवारी) सकाळी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांना एक गोपनीय पत्र मिळाल्याचं म्हटलं आहे. ‘एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आलं. या पत्राची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या पत्रात लिहिलं आहे की, समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी इथे चार ते पाच वाईनची दुकानं आहेत. या प्रत्येक वाईन दुकानाचा बाजारभाव पाच कोटी इतका आहे. ही जमीन केज येथे 1 कोटी 69 लाखांना 29 नोव्हेंबर 2024 रोजी घेतली. तीन दिवसांत याला परवानगी दिली गेली. वास्तविक जमिनीचा सातबारा 15 दिवसांनंतर होतो. पण सगळे कायदे कसे धाब्यावर बसवण्यात येतात याचं हे उदाहरण आहे’, असं अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
https://x.com/anjali_damania/status/1876484227308634593
अंजली दमानियांना मिळालं पत्र…समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे…
- Advertisement -