Tuesday, March 18, 2025

श्रीगोंद्यातील प्रस्थापितांची डोकेदुखी वाढली, अण्णासाहेब शेलार विधानसभा निवडणूक लढविणार

श्रीगोंदा राज्यपातळीवरील अनेक नेते विधानसभा निवडणूक लढवावी या दृष्टीने सकारात्मक आहेत, श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील सर्व गावांमधून उस्फूर्त पाठिंबा आहे, श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच नेत्यांना आजपर्यंत मी अनेक निवडणुकांमध्ये मदत केली असल्याने त्याची परतफेड या नेत्यांनी करावी असे आवाहन करत ही विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत सर्व ताकदीनिशी लढविणार असल्याची घोषणा अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.

श्रीगोंदा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेलार यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, आगामी दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक चुरस श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात दिसून येते. आपण यापूर्वी आ. बबनराव पाचपुते यांना नेते मानून त्यांना अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये तसेच अन्य निवडणुकांत मदत केली आहे. स्व. शिवाजीराव नागवडे यांना साखर कारखान्याच्या निवडणुकीत मदत केली, स्व. नागवडे यांच्या स्नुषा सौ. अनुराधाताई नागवडे यांच्या साठी मी. जि. प. चा उपाध्यक्ष असताना तसेच विद्यमान जि. प. सदस्य असताना थांबलो आणि त्यांना जि. प. सदस्य केले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी. आ. राहुल जगताप यांना विधानसभेसाठी मदत केली. मागील विधानसभा निवडणुकीत घनःश्याम शेलारांना मदत केली. त्यामुळे तेही मला मदत करतील अशी खात्री आहे. मी माझ्या राजकीय जीवनातली शेवटची निवडणूक लढविणार आहे. विजयी झालो तरी पुढील विधानसभा निवडपुकीत मी दुसऱ्याला संधी देणार आहे. पराजित झालो तरी ही पुन्हा कोणतीच निवडणूक आयुष्यात लढविणार नाही हा शब्द मी श्रीगर्गो‌द्यातील आम जनतेला देतो.

आपण तडजोडीतील उमेदवार असू असा अपप्रचार भविष्यात होवू शकतो, मात्र श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघातील आम जनतेला आठवण करून देवू इच्छितो की आ. पाचपुते यांचा कार्यकर्ता असताना २००९ साली बंड करून अपक्ष उमेदवारी केली. उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यावेळी मला अनेक प्रलोभणे दाखविली. मात्र मी निवडणुकीवर ठाम होतो. ती निवडणूक लढवून दाखविली. यावेळी मी निवडणूक लढविणार आहे, या मतावर ठाम असून या निवडणुकीची सर्व तयारी मी पूर्ण केली असल्याचा विश्वास ही श्री. शेलार यांनी व्यक्त केला.

यावेळी अण्णासाहेब शेलार पुढे म्हणाले कुकडी व घोड पाटपाण्याचा विषय दिवसेंदिवस जटिल बनत चालला आहे. पाण्याचे न्याय पदधतीने वाटप होत नाही. श्रीगोंदा तालुक्यावर सातत्याने अन्याय होतो. समन्यायी पद्धतीने पाणी वाटप व्हावे तसेच कुकडीचे दोन जास्तीचे आर्वतन होण्यासाठी डिंबे ते माणिकडोह बोगदा होणे गरजेचे आहे. घोड धरणातील गाळ काढून धरणाची उंची वाढविण्यासाठी तसेच अनेक प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मला विधानभवनात जायचे असल्याचे अण्णासाहेब शेलार म्हणाले.

राज्यातील नेते माझ्या उमेदवारीविषयी सकारात्मक राष्ट्रीय तसेच राज्यपातळी वरील नेते माझ्या अनेक महिन्यापासून संपर्कात आहेत. श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत मी उमेदवारी करावी म्हणून आग्रही आहेत. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करायची याबाबत मी चाचपणी करत असून त्याचा तिढा ही लवकर सुटेल. पक्षपातळीवर उमेदवारीचा तिढा सुटला नाहीतर मात्र मी अपक्ष विधानसभेची उमेदवारी करण्यावर ठाम आहे.

तिन्ही मित्रांचे भविष्य उज्ज्वल करणार

साजन पाचपुते, बाळासाहेब नाहाटा व दत्तात्रय पानसरे माझे खास मित्र आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या तिन्ही मित्रांनी मला मदत केली तर त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपण प्रयत्न करु असेही अण्णासाहेब शेलार पत्रकार परिषदेत सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles