राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होईल. रिक्त होणाऱ्या ५६ पैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत.राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं सोमवारी ही घोषणा केली. १३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. तर दोन राज्यांतील उर्वरित ६ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिलला संपणार आहे.ज्या १५ राज्यांत राज्यसभा निवडणुका होणार आहेत, त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. राज्यसभा सदस्यांची निवड राज्यांच्या विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून करण्यात येते.
महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार महाराष्ट्रातील खासदार पुढीलप्रमाणे
कुमार केतकर, काँग्रेस
वंदना चव्हाण, राष्ट्रवादी (शरद पवार गट)
प्रकाश जावडेकर, भाजप
मुरलीधरन, भाजप
नारायण राणे, भाजप
अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट