Sunday, July 14, 2024

Ahmednagar news:माजी आमदाराला खंडणी मागणाऱ्या विरुद्ध आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

अहमदनगर-अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देऊन आष्टीचे (जि. बीड) माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना १ कोटी रूपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या तथाकथित पत्रकाराविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा शनिवारी (२९ जून) रात्री उशिरा दाखल झाला आहे.

या प्रकरणी व्यावसायिक अकिब ऊर्फ अतिक मोहमंद शेख (वय २२रा. मोमीन गल्ली, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर (रा. मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तथाकथित पत्रकाराचे नाव आहे. त्याने शेख यांच्याकडे तीन लाख ७५ हजार रूपयांची मागणी करून ३० हजार रूपये घेतले आहे. शेख यांचे कपड्याचे दुकान असून त्यांची तथाकथित पत्रकार असलेल्या भैया बॉक्सर सोबत २४ मे २०२४ रोजी ओळख झाली होती.

त्यानंतर बॉक्सरने शेख यांना नगर – पाथर्डी रस्त्यावरील स्टेट बँक चौकातील छावणी परिषदच्या गाळ्यासमोर बोलून ‘तु काय धंदे करतो ते मला माहिती आहे, मी पत्रकार असून तु मला तीन लाख ७५ हजार रूपये दे नाहीतर मी तुझी चॅनलला बातमी लावून बदनामी करेन’ अशी धमकी दिली होती. धमकीला घाबरून शेख यांनी त्याला १८ जून २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास स्टेट बँक चौकातील रिजू याच्या चहाच्या टपरीवर ३० हजार रूपये दिले होते.

दरम्यान त्यानंतरही त्याने २६ जून २०२४ रोजी शेख यांच्याकडे उर्वरित तीन लाख ४५ हजार रूपयांची मागणी केली. ‘तु जर पैसे नाही दिले तर तुझी बातमी चॅनलला टाकीन’ अशी धमकी दिली व ‘टाइम्स ऑफ अहमदनगर’ या वेबपोर्टलवर गुटखा विक्री बाबतची बातमी प्रसारित केली.

दरम्यान ही बातमी प्रसारित झाल्यानंतर शेख हे बॉक्सरला भेटून ‘तु माझी विनाकारण बदनामी करू नको, मी कोणताही अवैध धंदा करत नाही’, असे समजावून सांगितले असता त्याने शेख यांच्याकडे पुन्हा तीन लाख ४५ हजार रूपये खंडणीची मागणी केली. ‘तु जर मला पैसे दिले नाहीतर तुला जिवंत मारून टाकीन’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles