महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आलेले असताना, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसीम शेख यांनी शहर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस प्रदेश कार्यालयात शेख यांनी पक्ष निधीसह उमेदवारी अर्ज पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करुन शहर विधानसभेसाठी दावा ठोकला आहे.
यावेळी काँग्रेसचे जयंतराव वाघ, बाळासाहेब भंडारी, श्यामराव वागस्कर, अभिजीत कांबळे, भूषण चव्हाण, सागर इरमल आदी उपस्थित होते. शहरात काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. शहर विधानसभेची जागा काँग्रेसला मिळून अल्पसंख्यांक समाजातील युवा उमेदवाराला दिल्यास तो निवडून येणार आहे. शहर विधानसभेसाठी काँग्रेसने अल्पसंख्यांक समाजातील युवा उमेदवाराला संधी द्यावी. लोकसभेत अल्पसंख्यांक समाजाची मते निर्णायक ठरली. हा समाज नेहमीच काँग्रेसच्या पाठीमागे राहिला असून, या समाजातून नेतृत्व दिल्यास त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याची भूमिका मांडून उमेदवारी देण्याची मागणी शेख यांनी केली आहे. युवा नेतृत्वाला संधी मिळाल्यास मतदार संघातील काँग्रेसचे युवक एकवटणार असल्याची भावना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
नगर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आणखी एका पदाधिकाऱ्यांनं ठोकला दावा
- Advertisement -