Sunday, February 9, 2025

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक, राजकीय क्षेत्रात खळबळ….

अहमदनगर -अमृत वाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष अमित पंडित यांना संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अटक केल्याने संगमनेर तालुक्यातील राजकीय क्षेत्रासह उद्योजकांमध्येही खळबळ उडाली आहे. 110 वर्षांची परंपरा असलेली अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या बँकेच्या घोटाळ्यात संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. अमित पंडित यांच्या मागे पोलीस अनेक दिवसांपासून होते. अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांना अटक करण्याचे आदेश दिले असल्याने संगमनेर शहर पोलीस त्यांचा मागोवा घेत होते. मात्र पंडित कुठेही मिळून आले नाही.
शनिवारी (दि 16) दुपारी तीन वाजेच्या सुमारास पंडितच्या घरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह उपनिरीक्षक रमेश पाटील, सहायक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे, आणि हरिश्चंद्र बांडे यांच्या पथकाने त्यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता ते कुठेही मिळून आले नाही. मात्र त्यांच्या बेडरूममध्ये पोलिसांनी झडती घेतली असता दडून बसलेला अमित पंडित सापडल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रासह व्यापारी तसेच सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles