Saturday, December 7, 2024

अंतरवाली सराटी येथील आंदोलकावर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते? RTI मधून धक्कादायक माहिती समोर

अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचाराबद्दल सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या या लाठीहल्ला प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याचा महत्वाचा खुलासा झाला आहे. माहिती अधिकारातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंतरवली सराटी येथे पोलिस कर्मचारी आणि मराठा आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचा आदेश दिल्याचा आरोप काहींकडून करण्यात येत होता. याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

या संपूर्ण लाठी हल्ला प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले नव्हते.. असं माहिती अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आरटीआय अर्ज केला होता.
या अर्जाला दिलेल्या उत्तरात आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश मिळाले नव्हते, अशी माहिती जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी दिली आहे.

दरम्यान, १ सप्टेंबर रोजी जालन्यामध्ये मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये हा संघर्ष झाला होता. मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणानंतर राज्यभरात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. ज्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles