गरिबांना कमी पैशात वैद्यकीय उपचार मिळाव्यात यासाठी सरकारने राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांकडून डॉक्टर लाच मागत असल्याची घटना नाशकात उघड झालीय. दरम्यान या प्रकरणात दोन डॉक्टरांना अटक करण्यात आलीय.
जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील तर २० हजारांची लाचेची मागणी डॉक्टरांकडून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आधी छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला होता. आता नाशिकमध्येही अशी घटना समोर आलीय. याप्रकरणात २ खासगी डॉक्टरांना अटक करण्यात आलीय. एसीबीने ही करावाई केलीय.
राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन खासगी डॉक्टरांनी ७ हजारांची लाच मागितली. लाचेच्या रक्कमेतून ७ हजार घेत असताना डॉक्टर महेश परदेशी आणि डॉक्टर महेश बुब यांना एसीबीने अटक केलीय. या प्रकरणात तक्रारदाराच्या आईच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निफाड तालुक्यातील पिंपळगावच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये सापळा रचला आणि डॉक्टरांना ताब्यात घेतलं. एसीबीची राज्यातील अशी पहिली कारवाई असावी, असं म्हटलं जात आहे.
जन आरोग्य योजनेत उपचाराठी २० हजारांची लाचेची मागणी… २ खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात
- Advertisement -