डासांपासून सुटका करण्यासाठी अनेकदा आपण कॉइल वापरतो, तर कधी रॅकेटचा वापर करतो. परंतु डासांपासून पूर्णपणे सुटका करण्याचा कोणताही खात्रीशीर उपाय नाहीये. वर्ल्ड ऑफ इंजिनीअर नावाच्या एक्स अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “एका चिनी इंजिनीअरने डासविरोधी हवाई संरक्षण सिस्टम तयार केली आहे.” ही सिस्टममध्ये एक लाँचर दिसत आहे, ज्यामधून तोफेच्या गोळ्याप्रमाणे एक विशेष प्रकारचा प्रकाश बाहेर पडताना दिसत आहे. तसेच यावेळी एक रडार यंत्रणा सतत फिरताना दिसते, जी हवेत उडणारे डास शोधत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडीओत इंजिनीअरने एक डायरी ठेवली आहे, ज्यामध्ये तो मेलेले डासांची नोंद करत आहे. शिवाय डास कधी मारला याची तारीख आणि वेळ देखील डायरीमध्ये लिहिल्याचं दिसत आहे.
डासांपासून कायमची सुटका..इंजिनीअरने बनवली डास मारण्याची भन्नाट मशिन VIDEO
- Advertisement -