विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या उपांत्य फेरीतल्या पहिल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांची मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर लढत झाली. या सामन्यात न्यूझीलंडचा तब्बल ७० धावांनी पराभव करत भारताने फायनलचे तिकीट पक्के केले. या सामन्यात विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय शतकांचं अर्धशतक पूर्ण करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटच्या या कामगिरीनंतर अनुष्काने त्याच्यासाठी खास पोस्ट केली.
“देव हा सर्वोत्कृष्ट लेखक आहे! मी देवाची खूप आभारी आहे की मला तुझं प्रेम मिळालं, तुला दिवसेंदिवस मजबूत होताना आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होताना मला बघता आलं. तू स्वत:शी आणि खेळाशी नेहमी प्रामाणिक राहिलास. तू खरोखरच दैवी देणगी आहेस,” असं अनुष्काने विराटचा एक फोटो शेअर करत लिहिलं.
इतकंच नाही तर अनुष्काने या सामन्यात ७ बळी घेणारा भारताच्या विजयाचा शिलेदार मोहम्मद शामीसाठीही स्टोरी टाकली आहे. त्याचा ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा फोटो शेअर करत तिने टाळ्या वाजवणारे इमोजी पोस्ट केले आहेत.
विराट कोहलीच्या ५० व्या शतकानंतर अनुष्का शर्माची पोस्ट; म्हणाली, मला तुझं प्रेम…
- Advertisement -