भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात रवींद्र जाडेजाने नाबाद ३९ धावा केल्या, तर विराट कोहली आणि मोहम्मद शमी भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. विराट कोहलीने या सामन्यात श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जाडेच्या साथीने भागीदारी केली. शेवटी भारताला विजयासाठी ५ धावांची आणि कोहलीला शतक पूर्ण करण्यासाठीही ५ धावांची गरज होती. यावेळी विराटने एक शॉट हवेत खेळला आणि तो ९५ धावांवर बाद झाला. विराट कोहलीचं शतक थोडक्यात हुकलं आणि तो सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी करू शकला नाही. शतक थोडक्यात हुकल्याने कोहलीसह त्याचे चाहते काहीसे नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर नवऱ्याला खंबीरपणे साथ देण्यासाठी अनुष्का शर्माने एक व्हिडीओ शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
अभिनेत्री अनुष्का शर्मा भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित नव्हती. परंतु, आपल्या पतीच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी आणि त्याचं मनोबल वाढवण्यासाठी अनुष्काने आयसीसीच्या सोशल मीडिया पेजवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ विराट ९५ धावांवर झेलबाद होतानाचा आहे. तो व्हिडीओ शेअर करुन अनुष्काने कॅप्शनमध्ये “मला तुझा कायम अभिमान वाटतो”, असं लिहिलं आहे. तसेच दुसऱ्या एका पोस्टमध्ये अनुष्काने विराटला वादळाचा पाठलाग करणारा (स्टॉर्म चेसर) असं म्हटलं आहे.
विराट कोहलीचं शतक ५ धावांनी हुकल्यावर पत्नी अनुष्का शर्माने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ, म्हणाली…
- Advertisement -