Monday, July 22, 2024

भनसाळी टिव्हिएसमध्ये अपाचे आरटीआर ब्लेझ ऑफ ब्लॅक सिरिजचे अनावरण

भनसाळी टिव्हिएसमध्ये अपाचे आरटीआर ब्लेझ ऑफ ब्लॅक सिरिजचे अनावरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील व श्रीरामपूर येथील भनसाळी टिव्हिएसमध्ये तरूणाईत लोकप्रिय असलेल्या बाईकचे अ ब्लेझ ऑफ ब्लॅक सिरीजचे लाँन्चिंग करण्यात आले. यावेळी भनसाळी टिव्हिएसचे अभिनंदन भनसाळी, जनरल मॅनेजर, तृप्ती कोंडा आणि बहुसंख्य नगरकर उपस्थित होते.
टिव्हिएस भारतीयांच्या पसंतीस उतरलेली एक नामांकित टु-व्हिलर कंपनी असून, आपल्या दर्जेदार व आकर्षक लुकमधील वाहनांमुळे तरूणवर्गाला अधिक आकर्षित करत आहे. अपाचे या टिव्हिएसच्या गाडीला तरूणाईने भरभरून प्रेम दिले आहे. सदर वाहनामध्ये असलेले पॉवरफुल इंजिन आणि जास्त फिचर्स नवतरूणाईला नक्कीच आकर्षित करतील, असे भनसाळी टिव्हिएसचे डायरेक्टर अभिनंदन भनसाळी यांनी सांगितले.
नवीन अपाचे आरटीआर 160 2 वॉल्व्ह आणि 4 वॉल्व्ह मध्ये उपलब्ध असून, डिजीटल अत्याधुनिक मीटर, 3 राईड मोड, एलईडी हेड लॅम्प डिआरएल सह, एमआयजी शॉकॲब्जॉबर, सिंगल चॅनलसह रोटोपेटल डिस्क, आकर्षक लुक, पॉवरफुल इंजिन, अधिक कार्यक्षमता, जबरदस्त पिकअप ही नवीन अपाचे आरटीआरची वैशिष्टये असून, अधिकाधिक लोकांनी सदर गाडी खरेदीसाठी भनसाळी टिव्हिएस, अहमदनगर व श्रीरामपूर येथील शाखेला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles