अन्नपदार्थांमध्ये प्रयोग करावेच लागतात. त्याशिवाय वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती होत नाही आणि चवीमध्ये बदल येत नाही. पण म्हणून चवीमध्ये बदल करण्यासाठी किंवा प्रयोग करायचा म्हणून ॲपल इडली किंवा सफरचंदाची इडली असं काही भलतंच लोक करायला लागले. thegreatindianfoodie या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सगळ्यात आधी तर त्या शेफने सफरचंदाच्या फोडी करून घेतल्या.
त्यानंतर त्या फोडी इडलीच्या पिठात कालवल्या आणि त्या पिठाच्या इडल्या लावल्या.इडली झाल्यानंतर त्या इडलीवर पुन्हा सफरचंदाची फोड ठेवली आणि काही डाळिंबाचे दाणे टाकून ती इडली वेगवेगळ्या चटण्यांसोबत सर्व्ह केली.