Tuesday, February 18, 2025

स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नगर जिल्ह्यातील पार्थ दोशी यांची नियुक्ती !

श्रीरामपूरकर बनला भारतीय क्रीडा क्षेत्राचा मुख्य कार्यकारी अधिकारी!

पार्थ दोशी यांची स्कूल गेम फेडरेशनच्या (SGFI )मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती.

श्रीरामपूर : भारतीय क्रीडा क्षेत्रातील मुख्य संस्था म्हणजे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया(SGFI). या संस्थेअंतर्गत भारतातील सर्व क्रीडा स्पर्धेचा आयोजन होते.या स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी श्रीरामपूरचे पार्थ सुरेश दोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या पदासाठी देशभरातून बरेचसे लोक प्रयत्नशील होते.दिनांक २८ सप्टेंबर रोजी लखनऊ येथे श्री दोशी यांनी आपला पदभार स्वीकारला असून निश्चितच त्यांच्या नियोजनामध्ये शालेय जीवनामध्ये मुलांना दर्जेदार स्पर्धा भारतामध्ये खेळायला मिळेल.दोशी हे भारतातील सर्वात युवा अध्यक्ष म्हणून देखील प्रसिद्ध आहे. त्यांनी सन २०१७ ते २०२१ पर्यंत महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्षपद देखील भूषवले आहे.खेलो इंडिया यूथ गेम्स,बीच व्हॉलिबॉल चा वर्ल्डकप असेल यासाठी देखील त्यांची स्पर्धा समीक्षक म्हणून नेमणूक देखील करण्यात आली होती.खेळासाठी व गुणवान खेळाडूंसाठी त्यांची धडपड कायम असते.अनेक राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात झाले आहे. दोषी हे स्वतः व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी महाराष्ट्राचे कर्णधार पद देखील भूषवले आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिमत्व सौ कनकंम दोशी यांचे ते चिरंजीव आहेत.
स्कूल गेम फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी(SGFI) नियुक्ती झाल्याबद्दल दोशी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री अविनाश आदिक,क्रीडा मार्गदर्शक श्री राजेंद्र कोहकडे, पत्रकार श्री स्वामीराज कुलथे,श्री नितीन बलराज,दादासाहेब तुपे, सुनील चोळके,पापा शेख,शैलेंद्र त्रिपाठी आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

पार्थ दोशी यांनी क्रीडा क्षेत्रासाठी व खेळाडूंसाठी आपले सर्वस्व लावले आहे. खेळासाठी काहीही सांगा कायम अग्रेसर असणारे व्यक्ति म्हणजे दोशी. स्वतः खेळाडू असल्यामुळे त्यांना खेळाडूंच्या समस्या माहित आहे. एका गुणवान व्यक्तीला हे पद मिळाले त्यातले त्यात श्रीरामपूरच्या व्यक्तीला मिळाले हा श्रीरामपूर सारख्या एक छोट्याशा गावाचा मोठा मान असून मी त्यांना श्रीरामपूरकरांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो निश्चितच पदाला साजेल असे ते काम करतील व देशाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील हीच मी अपेक्षा व्यक्त करतो –
गौरव डेंगळे (क्रीडा प्रशिक्षक)

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles