अहमदनगर प्रतिनिधी : राजकारण हे समाजकारणाचे माध्यम असून पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे. जेणेकरून जनतेमध्ये आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांची माहिती जनतेला द्यावी पद हे शोभेचे नसून काम करण्यासाठी आहे. तरी नवनिर्वाचित कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांगले काम उभे करावे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरणे समाजामध्ये रुजविण्याचे काम अक्षय पाथरीया त्यांच्या विविध
सामाजिक कामांचा अनुभव पक्ष वाढीसाठी नक्कीच होईल. असे प्रतिपादन अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भिंगार शहर संघटक पदी अक्षय पाथरीया यांचे नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार संग्राम जगताप यांच्या मान्यतेने व शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आले यावेळी शहर अध्यक्ष संपत बारस्कर, सचिन जगताप,निलेश मस्हे, सुमित कुलकर्णी,संदीप थोरात,प्रथमेश दळे, आदित्य ठाकूर, संदीप सकट, भूषण कांबळे, नीलेश धावडे, अस्लम पठाण, यश भिंगारदिवे, विराज लांडगे, सोनू पंडित, आशिष शेलार, शुभम पाटोळे, सौरभ चोटिले, सुप्रित कदम, अश्पाक पठाण,हर्षद वाघमारे, अनिकेत घोडके, अभिजीत चांडाळे, सूरज डोकडे, रोहन चांदेले, विशाल मुक्ता, तनय पाटोळे,आदी उपस्थित होते
नवनिर्वाचित भिंगार शहर संघटक अक्षय पाथरीया म्हणाले की पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी दिली असून ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल, पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे ध्येय धोरण जनतेपर्यंतघेऊन जाण्याचे काम केले जाईल असे ते म्हणाले
राष्ट्रवादी भिंगार शहर संघटक पदी अक्षय पाथरीया यांची नियुक्ती
- Advertisement -