Saturday, January 25, 2025

नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये नल जल मित्रांची नियुक्ती, सिईओ आशिष येरेकर

सर्व ग्रामपंचायत मध्ये नल जल मित्रांची नियुक्ती जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा उपक्रम
अहमदनगर – जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी-प्लंबर, मोटर मेकॅनिक- फिटर व इलेक्ट्रिशियन – पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन कौशल्य संचाची नल-जल मित्रांची नेमणूक केली जाणार आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती योग्यरीतीने होण्यासाठी प्रति ग्रामपंचायत ३ नल-जल मित्र यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर तिन्ही पदांकरता प्रत्येक पदासाठी तीन याप्रमाणे प्रति ग्रामपंचायत ९ उमेदवारांचे अर्ज ग्रामपंचायतीने अॅपवर भरायचे आहेत. राज्यस्तरावर ग्रामपंचायतीने भरलेल्या अर्जांमधून उमेदवारांची निवड करून त्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणारआहे. प्लम्बर – गवंडी, मोटर मेकॅनिक- फिटर आणि इलेक्ट्रिशियन- पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी गावातील पूर्वा अनुभव असलेल्या व आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे. प्लम्बिंग-गवंडी, मोटर मेकॅनिक- फिटर व इलेक्ट्रिशीयन – – पंप ऑपरेटर ही कौशल्ये असलेल्या उमेदवारांना गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे. शासनाच्या या योजनेमुळे प्रति ग्रामपंचायत कौशल्य संचसाठी एक ट्रेडसाठी एक याप्रमाणे अंतिम ३ पैकी १ उमेदवारांची निवड होणार आहे. कुशल उमेदवारांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात सर्व
ग्रामपंचायतींमध्ये नल-जल मित्रांची नेमणूक करण्यात येणार असून त्यांच्याकडून पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातील.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles