नगर तालुक्यासारख्या कायम दुष्काळी असलेल्या भागात वाळकी सारख्या गावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येवून जिद्दीच्या बळावर थेट पोलिस निरीक्षक पदी मजल मारत शेतात काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या माता पित्यांचे स्वप्न पोलिस निरीक्षक बाजीराव देविदास नाईक यांनी साकार केले असून त्यांची नुकतीच मुंबईत नियुक्ती झाली आहे.
नगर तालुक्यातील वाळकी येथील शेतकरी देविदास दामू नाईक, पत्नी जानकाबाई देविदास नाईक यांनी स्वतः च्या शेतीबरोबर दुसऱ्याची शेती वाट्याने करत आपल्या मुलांनी मोठ्या अधिकारी पदावर काम करण्याचे स्वप्न बाळगले होते. यासाठी त्यांनी काबाड कष्ट करून मुलांना शिक्षणात कोणतीच कमतरता भासू दिली नाही.
त्यांचा मुलगा बाजीराव नाईक यांनी शिक्षणानंतर घरखर्चाला हातभार लागावा यासाठी नगरच्या कायनेटिक कंपनीत दोन वर्षे काम केले. त्यानंतर सुपा एमआयडीसीत एक वर्ष काम केले. या दरम्यान पोलीस भरतीत त्यांनी बाजी मारली. पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करत असताना त्यांनी एमपीएससी ची परीक्षा देऊन ते उत्तीर्ण झाले. त्यामुळे ते कॉन्स्टेबल चे पोलीस उपनिरीक्षक झाले. नाशिक येथे ट्रेनिंग पुर्ण केल्यानंतर दहा वर्ष मुंबईत साकीनाका, सहारा एअरपोर्ट, विरार, मालाड, विक्रोळी येथे काम करताना आपली वेगळी निर्माण करत कामाचा ठसा उमठवला. त्यानंतर त्यांची पुण्यात शिवाजी नगर येथे बदली झाली. येथेही त्यांनी दोन वर्ष आपल्या खाकी वर्दीचा दम दाखवत पोलीस दलाची मान उंचावली.
नुकतेच त्यांना पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली असून पुन्हा मुंबईत त्यांची नियुक्ती झाली आहे. बाजीराव नाईक यांनी आई वडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मोठे कष्ट उपसले. नावातच ‘ बाजी ‘ असणाऱ्या बाजीराव यांनी अखेर आई वडीलांचे स्वप्न साकार करत आपण ‘बाजीगर ‘ असल्याचे दाखवून दिले.
बाजीराव नाईक यांना पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाल्याचे समजताच त्यांच्या आई वडीलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. त्यांच्या बढती बद्दल वाळकी ग्रामस्थ, मित्र मंडळींनी फटाक्यांची आ