Monday, June 17, 2024

ठेकेदाराचा मनमानी कारभार! महिला सरपंचांसह सदस्यांचा नगर तालुका पंचायत समिती समोर ठिय्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- दरेवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ स्वाती सुभाष बेरड यांनी अनेक वेळा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना पत्र व्यवहार करून देखील गावात १५ वा वित्त आयोग योजनेचे विविध विकास कामे वेळेत न केल्यामुळे परवानाधारक ठेकेदार जाणीवपूर्वक कामे सुरू करत नसल्याच्या निषेधार्थ ठेकेदारावर कारवाई करुन कामे त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण करताना सरपंच सौ स्वाती बेरड, सुभाष बेरड, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र बेरड, बाबासाहेब वीर, एकनाथ ससे, अक्षय भिंगारदिवे, बाबासाहेब करांडे, संदीप सपकाळ, सौ. आशाताई निंबाळकर, आकाश बडेकर, परमेश्वर बेरड, देविदास करांडे, राजेंद्र रासकर, सुनील बेरड, दीपक घोलप, विजय मोरे, शिवाजी बेरड, बद्रीनाथ बेरड, रमेश बेरड, सागर बेरड, नितीन रासकर, रमेश बेरड, श्रीकांत जगताप, राजू वाकळे, रोहिदास शिंदे, सुनील बेरड, संजय भिंगारदिवे, गोरख बेरड, निखिल बेरड आदी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हंटले आहे की, दरेवाडी गावात १५ वा वित्त आयोग योजने अंतर्गत विविध विकास कामे गावठाण बाजार तळ शौचालय व मुतारी बांधकाम करणे, मुस्लिम समशानभूमीत तार कंपाऊंड करणे, गोकुळवाडी येथील समशानभूमी ओपन स्पेस परिसर तार कंपाऊंड करणे, गावठाण अंगणवाडी दुरुस्ती करणे, इमारत पाऊस पाणी संकलन करणे, अंगणवाडी इमारतीस पत्रा शेड करणे, जि.प. शाळा वाचनालय बांधणे व पाण्याची टाकी जवळ खोली बांधण्याच्या कामासाठी संबंधित ठेकेदार हा दुर्लक्ष करत असून याची जिल्हा परिषद व पंचायत समिती कडे तक्रार केली होती. मात्र तोंडी समज देऊन येत्या आठ दिवसात कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १० महिने झाले व ग्रामपंचायतीने ठेकेदारांना ३ नोटीसा बजावल्या मात्र त्यांनी घेतलेली कामे केली नाही त्यामुळे अहमदनगर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले असून ठेकेदार अक्षय उंदरे, विक्रांत पानसंबळ, ज्ञानेशवर गोरे या ठेकेदारांवर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या सर्व कामांपासून काळया यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles