Saturday, October 5, 2024

महिलेसोबत वाद करून तक्रार देण्यासाठी आला अन् ,नगर तालुक्यातील आरोपी हत्यारासह पकडला

अहमदनगर -महिलेसोबत वाद करून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरूणाच्या कारमध्ये धारदार हत्यारे मिळून आल्याची घटना शनिवारी (28 सप्टेंबर) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात घडली. रवींद्र उत्तम जाधव (वय 32 रा. निंबळक ता. नगर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या ताब्यातून एक लोखंडी तलवार, एक लोखंडी सुरा व कार असा दोन लाख 52 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परि.पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र जाधव व एका महिलेचे वाद झाले होते. ती महिला तक्रार देण्यासाठी शनिवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात आली होती. तिच्या मागे रवींद्र जाधव देखील पोलीस ठाण्यात आला. दरम्यान, त्याच्या कारमध्ये घातक हत्यारे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक शैलेश पाटील, परि.उपनिरीक्षक गायधनी, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, भानुदास खेडकर, सुमित गवळी, सतीष त्रिभुवन, सतीष भवर, शफी शेख यांच्या पथकाला पंचासमक्ष कारची झडती घेण्यास सांगितली. पथकाने रवींद्र जाधव याची कारची (एमएच 15 सीडी 0591) झडती घेतली असता त्यामध्ये तलवार (Sword), सुरा मिळून आला. पोलिसांनी कार व हत्यारे जप्त केले. त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चांगदेव आंधळे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles