Tuesday, February 18, 2025

लष्करी जवानाच्या पत्नीने १० वर्षाच्या मुलाला फाशी देत स्वत:ही संपवले जीवन ,नगर मधील घटना

अहमदनगर – बीएसएफ मध्ये असलेल्या लष्करी जवानाच्या पत्नीने १० वर्षाच्या मुलाला फाशी देत स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी जामखेड रोड वरील लष्करी वसाहतीत उघडकीस आली आहे. या प्रकारणी लष्करी जवान असलेल्या पतीवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणी बाळकृष्ण तिकोने (वय ३०) व स्वराज बाळकृष्ण तिकोने (वय १०) असे दोघा मयतांची नावे आहेत. तिकोने कुटुंबीय मुळचे पारनेर तालुक्यातील वेसदरे येथील रहिवासी असून ते सध्या भिंगारच्या लष्करी हद्दीत जामखेड रोड वर दमानिया बंगल्याच्या समोर राहत होते. बाळकृष्ण तिकोने हे सध्या बीएसएफ मध्ये कार्यरत आहेत. ते शुक्रवारी दुपारी सुट्टीवर घरी आले. मात्र बराच वेळ घराचा दरवाजा उघडला गेला नाही, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीच्या आई वडील व नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले.

ते आल्यावर त्यांनीही अनेक वेळा आवाज दिला मात्र दरवाजा न उघडल्याने बाळकृष्ण तिकोने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी आपली पत्नी दरवाजा उघडत नसल्याचे सांगून पोलिसांना बरोबर नेले. पोलिसांनी सायंकाळी ६ च्या सुमारास दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर त्यांना राणी तिकोने व स्वराज या दोघांचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.पोलिसांनी पंचनामा करत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले.

दरम्यान शनिवारी (दि.३०) मयत राणी हिच्या माहेरकडील नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी लष्करी जवान बाळकृष्ण तिकोने याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बाळकृष्ण तिकोने हा मयत राणी हिचा कायमच छळ करत होता, त्याला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles