Wednesday, June 25, 2025

लोकसभा निवडणुक बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून तिसऱ्या टप्प्यासाठी ७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या काळात अवैध्य पैशांचा वापर होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख नाकाबंदी केली आहे खामगाव चेक पोस्टवर पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून ही रोकड नेली जात होती. वाहनाची तपासणी करत असताना कारमध्ये लोखंडी पेटी आढळून आली. पोलिसांनी कारचालकाकडे याबाबत विचारपूस केली.

त्याने ही रक्कम द्वारकादास मंत्री बँकेची असल्याचे सांगितले. परंतु त्याच्याकडे आवश्यक कागदपत्र आढलून आले नाही. दरम्यान, सध्या पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली आहे. यावेळी कसल्याच प्रकारचे बारकोड संबंधिताकडे नसल्याने अनेक संशय व्यक्त होत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles