राज्यात एनडीएचा घटक म्हणून वावरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल प्रदेशात मोठी खेळी केलीय. अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षाला बाजुला सारत आपल्या आठ उमेदवारांची नावे घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आलीय. यामुळे अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय
उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातर्फे सोमवारी अरुणाचल प्रदेशातील जनसंपर्क कार्यक्रमादरम्यान उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यात माजी आमदार लिखा साया, माजी मंत्री तपांग तलोह, लोमा गोलो, न्यासम जोंगसम, न्गोलिन बोई, अजू चिजे, मंगोल योमसो आणि सलमान मोंगरे यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ८ उमेदवार जाहीर, स्वबळावर लढवणार निवडणूक….
- Advertisement -