Sunday, July 14, 2024

आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अरुणोदय हॉस्पिटलने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

नगर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सेवा दिवसेंदिवस महागडी होत चालली आहे यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आजारपणावर उपचार करून घेता येत नाही यासाठी अरुणोदय हॉस्पिटलने शिबिराच्या माध्यमातून गरजूंपर्यंत रुग्णसेवा घेऊन जाण्याचे काम केले आहे सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत वर्षभर विविध शिबिराचे आयोजन करून रुग्णांना आधार देण्याचे काम केले जात आहे माझ्या वाढदिवसा निमित्त अरुणोदय हॉस्पिटलने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून खऱ्या अर्थाने रुग्णसेवा केली आहे सर्वरोग निदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णाच्या आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करता येत असतात यासाठी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन होणे ही काळाची गरज बनली आहे महागड्या आरोग्य सेवेमुळे सर्वसामान्य रुग्ण आपल्या आजारपणाकडे दुर्लक्ष करत असतात मात्र डॉ.शशिकांत फाटके व डॉ.वंदना फाटके यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील रुग्णांची आरोग्यसेवा घडण्याचे काम होत आहे अशी प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने गरजू रुग्णांसाठी आयोजित मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी डॉ. शशिकांत फाटके, डॉ. वंदना फाटके, अभिजीत खोसे, डॉ.प्रदीप जयस्वाल, डॉ.नितीन वर्पे, डॉ.पूजा गायकवाड, डॉ.आनंद बोज्जा, नानासाहेब फाटके, प्रयोगाबाई फाटके, अलका मुंदडा, उषा सोनी, अनिता काळे, दिनेश जोशी, गणेश कोकरे, संभाजी बोरुडे, शकील देशमुख , डॉ.रोहित औशिकर, डॉ.समीर होळकर आदी उपस्थित होते.
डॉ.शशिकांत फाटके म्हणले की, अरुणोदय हॉस्पिटलच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करून गरजूवंत रुग्णांची सेवा केली जात आहे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चार दिवस मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले असून यात खुबा बदली, गुडघे बदली, कॅन्सर शस्त्रक्रिया, अपघाताच्या रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच दाता संबंधित सर्व प्रकारच्या मुख कर्करोग, हिरड्यांचे आजार, दंत व्यंग, लहान मुलांचे दाताचे आजार, कृत्रिम दत्तरोपण, तोंडाचे अल्सर,लहान मुलांचे व वृद्धांचे हलणारे दात काढणे प्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. याचबरोबर नेत्र तपासणी डोळ्याचे ऑपरेशन देखील मोफत करण्यात येणार आहे. या शिबिरात अनेक रुग्णांनी सहभागी होत लाभ घेतला आहे, तरी जिल्हाभरातील रुग्णांनी मोठ्या संख्येने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles