पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवतात, असं केजरीवाल म्हणाले आहेत. ते हरियाणाच्या प्रचार सभेत बोलत होते.
२७ जून २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, अजित पवार यांनी ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यांना आम्ही तुरुंगात पाठवणार. पाच दिवसांनी २ जुलै रोजी त्यांना भाजपमध्ये सामील करून घेण्यात आलं आणि त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. मला भाजपला विचारायचं आहे, त्यांना लाज वाटत नाही का? तुम्ही काय तोंड घेऊन घरी जाता, असं म्हणत केजरीवाल यांनी जोरदार शाब्दिक प्रहार केला.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर सीबीआय आणि ईडीने गुन्हा दाखल केला होता. पंतप्रधान मोदींनी तो गुन्हा बंद करून टाकला, असं केजरीवाल म्हणाले. घोटाळा गेलेले २५ ‘नमुने’ आता मोदींचे मंत्री झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.