Tuesday, February 18, 2025

पुणे अपघातावरून रॅप करणाऱ्या आर्यनचा कारवाईनंतर आणखी एक व्हिडीओ व्हायरल

पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी भरधाव पोर्श कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा त्यावेळी ही पोर्श कार चालवत होता. अपघातानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. मात्र अवघ्या काही तासांनी त्याला जामिनावर सोडण्यात आलं. त्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली. दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या चेहऱ्याशी थोडंफार साम्य असलेल्या तरुणाने एक रॅप साँग बनवून सोशल मीडियावर शेअर केलं. हे गाणं खूप व्हायरलही झालं. त्यामुळे अनेकांना वाटलं की, हाच आरोपी असून तो स्वतःच्या कृत्याचं समर्थन करतोय. त्यामुळे या घटनेबद्दल आणखी चीड निर्माण झाली होती. अशातच हे रॅप साँग गाणाऱ्या तरुणाविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्यन देव नीखरा असं या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरचं नाव असून त्याने पुणे अपघात प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ बनवला होता. या गाण्यामुळे लोकांमध्ये आणखी चीड निर्माण झाली होती. अखेर अल्पवयीन आरोपीच्या आईला हा तिचा मुलगा नसल्याचं जाहीर करावं लागलं होतं. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीदेखील पत्रकार परिषदेत सांगितलं की, हा फेक व्हिडीओ आहे. त्याचबरोबर आर्यनविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ५०९, २९४ ब या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्यनने आणखी एक व्हिडीओ जारी करून प्रशासनावरील संताप व्यक्त केला आहे. “मूळ प्रकरणावरून सर्वांचं लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे”, असं आर्यनने म्हटलं आहे. “मी कोणालाही शिवीगाळ केली नव्हती, मी एक सामान्य माणूस असल्यामुळे माझ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे”, असंही तो म्हणाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles