Sunday, July 14, 2024

मुलगा मुख्यमंत्री होणार का? अजित पवारांच्या आई म्हणाल्या…

पुणे : बारामतीतील काटेवाडीत मतदानाला सुरुवात झाली आहे. याच काटेवाडीत पवार कुटुंबियांचं मतदान आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी मदनाचा हक्क बजावला. यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा आशा पवार यांनी व्यक्त केली. माझ्या डोळ्यादेखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं, असंदेखील त्या म्हणाल्या. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.

‘मी 1957 पासून काटेवाडीत मतदान करते आहे. पुर्वीच्या काटेवाडीत आणि आताच्या काटेवाडीत भरपूर बदल झाले आहेत. अनेकांनी यासाठी हातभार लावला आहे. राज्यातील अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावं, असं सगळ्यांना वाटतं. तसंच आई म्हणून माझ्यादेखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं. माझं वय आता 84 झालं आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे मलाही अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं बघायला आवडेल’, अशी इच्छा अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles