Saturday, January 25, 2025

मुख्यमंत्री कार्यालयाच्या IAS अधिकारी अश्विनी भिडे प्रधान सचिवपदी, श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव नियुक्ती

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची बदली झाली आहे. भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांना त्वरीत या पदाचा कारभार हाती घेण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. याआधी मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार ब्रिजेश सिंह हे पाहत होते. आता त्यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील २५ वर्षांचा अनुभव आहे. मुंबईतील मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

श्रीकर परदेशी बनले मुख्यमंत्र्यांचे सचिव

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कवठेमहांकाळ शहरातील सुपुत्र श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी यांना मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

श्रीकर परदेशी यांनी प्रधानमंत्री कार्यालयात देखील काम केले आहे. परदेशी यांच्या कामाची पोहोचपावती असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे ते मुख्य सचिव म्हणून त्यांना पदभार दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles