ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. ठाकरे गटाचे घाटकोपर भटवाडीचे माजी नगरसेवक दीपक हांडे आणि सौ. अश्विनी हांडे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. तेव्हापासून ठाकरे गटाला रामराम करत अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता हांडे यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे गटाचे घाटकोपर भटवाडीच्या प्रभाग क्रमांक 128 चे माजी नगरसेवक दीपक हांडे आणि माजी नगरसेविका सौ.अश्विनी हांडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी हांडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत केलं. तसंच त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना सचिव सुशांत शेलार आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हांडे यांच्यासोबतच ठाकरे गटाच्या वसई-नालासोपारा महिला संपर्क प्रमुख भारती गावकर यांनीही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच उपशाखाप्रमुख राजूभाई शिर्सेकर, हसमुख महाराज रावल, रमाकांत झगडे, रोहित बोऱ्हाडे, अमोल गाढवे, राकेश बोढेकर, युवा सेना अधिकारी संतोष मोरे, चंद्रकांत कुंजीर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला