Sunday, December 8, 2024

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची १०० पदके पूर्ण… देशभरातील क्रीडा प्रेमींमध्ये उत्साह

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला कबड्डी संघाने चायनीज तैपेई संघाचा २६-२४ असा पराभव करून सुवर्णपदकावर कब्जा केला. कबड्डीचा सामना अतिशय रोमांचक झाला आणि शेवटपर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. या सुवर्णासह भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत देशाने प्रथमच १०० पदके जिंकली आहेत. भारतीय क्रीडा जगतासाठी हे चांगले संकेत आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची १०० पदके पूर्ण करणे ही एक महत्त्वाची कामगिरी असल्याचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, १० ऑक्टोबर रोजी भारतीय तुकडीचे स्वागत करणार आहे. पंतप्रधान मोदीं ट्विटरवर पोस्ट करताना म्हणाले, “प्रत्येक आश्चर्यकारक कामगिरीने इतिहास रचला आणि आमचे हृदय अभिमानाने भरले. मी १० ऑक्टोबर रोजी आमच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय पथकाचे स्वागत करीन आणि खेळाडूंशी चर्चा करेन.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles