Tuesday, April 29, 2025

ब्रेकिंग न्युज…शिंदेंकडे गेलेले 12 आमदार ठाकरेंकडे परतणार…सरोदे यांनी यादीच वाचली

ठाकरे गटाचे वकील असीम यांनी १२ आमदारांची यादीच वाचत हे सगळेजण उद्धव ठाकरेंकडे परतणार असल्याचा दावा केला आहे. एका सभेत बोलत असताना असीम सरोदे यांनी यादीच वाचून दाखवली. श्रीनिवास वनगा, लता सोनवणे, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, नितीनकुमार तळे, प्रदीप जैसवाल, उदयसिंह राजपूत, महेश शिंदे, प्रकाश आबिटकर हे १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार आहेत असा दावा असीम सरोदेंनी केला आहे.

हे बारा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात परतण्यास तयार आहेत. कारण त्यांच्या लक्षात आलं आहे की यांच्यासह (एकनाथ शिंदे) आपलं भविष्य नाही ज्यांना ठाणे जिल्ह्याच्या बाहेर ओळख नाही असा टोलाही असीम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles