15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत
होमगार्डमध्ये सेवा करण्यास इच्छुक उमेदवारांनी
15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत
अहमदनगर दि. 31 जुलै :- जिल्ह्यातील होमगार्डमध्ये विविध पथकांच्या रिक्त असलेल्या 359 नवीन होमगार्ड सदस्यांच्या नोंदणीसाठी 15 ऑगस्ट, 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असुन होमगार्डमध्ये सेवा करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड प्रशांत खैरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. याबाबतची विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
–
No
Job