नगर शहरातील बालिकाश्रम रोड येथे गाजलेल्या गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपी बबलू सरोदे याच्यावर आज शनिवारी बालिकाश्रम रोड येथे प्राण घातक हल्ला करण्यात आला. हल्ला झाल्यानंतर सदर आरोपीला माळीवाडा परिसरामध्ये या घटनेतील मुख्य आरोपी समजले जाणाऱ्या गणेश हुच्चे यांच्या हॉटेल समोर आणून टाकण्यात आले. सदरचा हल्ला हा कोणी केला याचा शोध पोलीस घेत आहे. घटनास्थळी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल नेमका हल्ला कोणी केला याचा शोध आता पोलीस प्रशासन घेत आहे.
नगर शहरातील गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर प्राणघातक हल्ला…
- Advertisement -