एका नववधुचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नवरदेवाच्या एन्ट्रीवर नवरी मुलीने डान्स केला आहे. आपल्या होणाऱ्या साथीदाराला पाहताच नववधूच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य, त्या क्षणाचा आनंद आणि त्या आनंदात तिने केलेला डान्स पाहून तुम्हालाही मस्त वाटेल .
व्हायरल व्हिडीओत दिसतंय त्यानुसार, जेव्हा मिरवणूक दारात पोहोचते तेव्हा नववधू स्वत:ला रोखू शकली नाही. नववधू नवरदेवाला पाहताच नाचताना दिसत आहे. साजन मेरे सतरंगी, मेरा पिया घर आया ओ रामजी या गाण्यावर वधू थिरकताना दिसत आहे.