Tuesday, February 27, 2024

अटल सेतूचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन,पण प्रवासासाठी किती टोल द्यावा लागणार वाचा दरपत्रक…

मुंबई-सागर, जमीन आणि दलदल अशा तीनही भागांमध्ये उभारलेला सुमारे 21 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तीन स्थापत्य कंत्राटदार, एक इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम कंत्राटदार, विविध 10 देशांतील विषयतज्ज्ञांनी आपले योगदान दिले असून 1500 हून अधिक अभियंते, तर सुमारे 16500 कुशल मजुरांनी तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम केले आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे 1.2 लाख टन स्टील वापरण्यात आले आहे. इतक्याच स्टीलमध्ये चार हावडा ब्रिज उभारले जाऊ शकतात. प्रकल्पासाठी आठ लाख 30 हजार क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर झाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी लागलेल्या काँक्रीट पेक्षा हे सहापट अधिक आहे. तर, या प्रकल्पात वापरण्यात आलेले स्टील आयफेल टॉवरमध्ये वापरले गेलेल्या स्टीलच्या 17 पट अधिक आहे. सुमारे एक हजार खांबांवर उभारल्या गेलेल्या या मार्गावर 100 किमी प्रती तास वेगाने प्रवास करता येणार असून दररोज सुमारे 70 हजार वाहने वाहून नेण्याची याची क्षमता आहे.

अटल सेतूसाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याची एकूण लांबी 22 किलोमीटर असून यापैकी 16.5 किलोमीटरचा भाग समुद्रात आणि सुमारे 5.5 किलामीटरचा भाग जमिनीवर उन्नत स्वरूपात आहे. यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग हा जोडला गेला आहे आणि पूर्व-पश्चिम असणारा वरळी-शिवडी उन्नतमार्ग हा भविष्यात अटल सेतू प्रकल्पास जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याद्वारे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूद्वारे विनाथांबा मुख्य भूमीकडे जाणे शक्य होणार आहे. साहजिकच प्रवासाचे अंतर कमी झाल्याने आणि एक तासाहून अधिक प्रवास वेळेची बचत होणार असल्याने हरितगृह वायू उत्सर्जन सुद्धा कमी होणार आहे.
अटल सेतूसाठी नेमका किती टोल भरावा लागणार?
अटल सेतूवर नेमका कोणत्या वाहनांना किती टोल भरावा लागणार आहे, याविषयी माहिती समोर आली असून त्यानुसार प्रत्येक वाहनासठी एकेरी, दोन्ही बाजूंनी, दैनंदिन आणि मासिक पास अशा स्वरूपाचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

कार/चारचाकी – चारचाकी वाहनांच्या एकेरी वाहतुकीसाठी अटल सेतूवर एका बाजूना वाहतुकीसाठी २५० तर दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी ३७५ रुपये इतका टोल आकारण्यात येईल. दैनंदिन पाससाठी ६२५ तर मासिक पाससाठी १२ हजार ५०० रुपये असा दर आकारण्यात येणार आहे.

मिनीबस – छोट्या बसेससाठी एका बाजूने ४०० तर दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी ६०० रुपये टोल आकारला जाईल. दैनंदिन पाससाठी १ हजार तर मासिक पाससाठी २० हजार रुपये इतका दर आकारला जाईल.

छोटे ट्रक/वाहने (२ एक्सेल) – छोट्या ट्रकसाठी एका बाजूच्या वाहतुकीसाठी ८३० तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी १२४५ रुपये इतका टोल आकारला जाईल. त्यात दैनंदिन पाससाठी २०७५ तर मासिक पाससाठी ४१ हजार ५०० रुपये इतका दर आकारला जाणार आहे.

एमएव्ही (३ एक्सेल) – या प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतुकीला ९०५ रुपये तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी १३६० रुपये इतका टोल भरावा लागेल. दैनंदिन पाससाठी २२६५ तर मासिक पाससाठी ४५ हजार २५० रुपये इतका दर आकारला जाईल.

मोठे ट्रक/वाहने (४-६ एक्सेल) – या प्रकारच्या वाहनांना एका बाजूने १३०० रुपये तर दोन्ही बाजूंसाठी १९५० रुपये इतका टोल भरावा लागेल. तर दैनंदिन पाससाठी ३२५० रुपये आणि मासिक पाससाठी ६५ हजार रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे.

अवजड वाहने – या श्रेणीतील वाहनांसाठी अटल सेतूवर एका बाजूने १८५० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंसाठी हाच दर २३७० इतका आहे. या वाहनांना दैनंदिन पास हवा असल्यास त्यासाठी ३९५० रुपये मोजावे लागणार आहेत. मासिक पाससाठी या वाहनांना ७९ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles