Ather Energy इलेक्ट्रीक टू व्हीलर कंपनी Ather Energy ने पहिली फॅमिली स्कूटर लाँच केली आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर भारतीय कुटुंबाच्या गरजांना विचारात घेऊन बनविण्यात आली आहे.
कंपनीने रिझ्टामध्ये ५६ लीटरची बुट स्पेस दिली आहे. तसेच सीटवर नवरा-बायको आणि मुल असे तिघेजण आरामात बसू शकतील एवढी लांबी दिली आहे. या स्कूटरची किंमतही कंपनीने 1,09,999 रुपयांपासून सुरु केली आहे. फक्त एक महत्वाचा बदल म्हणजे कंपनीने या स्कूटरमध्ये हब मोटर दिली आहे. तसेच टचस्क्रीन ऐवजी जॉय स्टीक दिली आहे. या द्वारे स्क्रीनवरील गोष्टी हाताळता येणार आहेत. Rizta S मध्ये ७ इंचाचा नॉन-टच डीपव्यू डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. तर झेड व्हेरिअंटरमध्ये टचस्क्रीन देण्यात आली आहे. पुढे टेलिस्कोपिक फोर्क, १२ इंचाचे अलॉय व्हील, फ्रंट डिस्क ब्रेक आदी देण्यात आले आहेत. Rizta चे कंपनीने दोन व्हेरिअंट आणले आहेत. यामध्ये एस आणि झेड असे बॅटरी पॅकनुसार तुम्हाला निवडता येणार आहेत. Rizta S मध्ये 2.9 kWh छोटी बॅटरी पॅक आहे. 121 किमीची आयडीसी तर १०५ किमीची ट्रू रेंज देत असल्याचा दावा केला आहे. Rizta Z मध्ये 3.7 kWh ची बॅटरी पॅक देण्यात आली आहे. हे व्हेरिअंट 160 किमी (125 किमी ट्रू रेंज) देते.