Tuesday, February 18, 2025

Ahmednagar news:कापड दुकान मालकाच्या मुलासह कुटुंबातील पाच जणांवर अ‍ॅट्रोसिटी दाखल

तू माझी बदनामी का करते, मला सर्व माहीत आहे, माझी जर आता बदनामी केली तर तुझा मर्डर करेल आणि जे शरीरसुख मला तिच्याकडून भेटले नाही ते तुझ्याकडून करून घेईल, असे धमकावून कापड दुकानात कामास असलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद पीडित महिलेने दाखल केली आहे. यावरून कापड व्यावसायिकाच्या मुलासह कुटुंबातील पाच जणांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधात्मक कायद्यासह इतर कलमान्वये राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राहाता शहरातील लोकरुचीनगर येथे महामार्गालगत असणार्‍या जितेंद्र एन एक्स कापड दुकानात कामाला असणार्‍या महिलेला आठ दिवसांअगोदर दुकान मालकाचा मुलगा सार्थक चोरडिया याने फोनवरून म्हणाला, तू माझी बदनामी का करते. मला सर्व माहीत आहे. आता बदनामी केली तर तुझा मर्डर करेल. जे शरीरसुख तिच्याकडून मला भेटले नाही ते तुझ्याकडून करून घेईल असं बोलून महिलेला शिवीगाळ केली. तदनंतर दि.14 जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संबंधित महिला विहिरीवर आत्महत्या करण्याच्या इराद्याने गेली होती. तेव्हा तिच्या नातेवाईकांनी विहिरीवरून पकडून तिला घरी आणले होते. यावेळी तिने दुकान मालकाचा मुलगा सार्थक चोरडिया याने माझ्यासोबत फोनवर जे बोलला ते मी माझ्या भावांना सांगितले त्यानंतर माझे भाऊ व मी स्वतः असे आम्ही जितेंद्र एन एक्स कापड दुकानात सार्थकला जाब विचारण्यासाठी गेलो.

तेथे आम्ही बोलत असताना अचानक सार्थकने आम्हाला मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तेथे लाबेश चोरडिया, दिनेश चोरडिया, कमलेश चोरडिया, निलेश चोरडिया आले व त्यांनी आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. दरम्यान आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या मारहाणीत माझा भावाच्या उजव्या हाताला दुखापत झाली.दुसर्‍याच्या पायाला व बरगडीत मार तर तिसर्‍यालाही बरगडीत आणि पाठीला मार लागला. त्यानंतर आम्ही भावांना उपचारासाठी शिर्डी येथील साईसुपर हॉस्पिटल येथे दाखल केले. महिलेच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी सार्थक चोरडिया, लाभेश चोरडिया, दिनेश चोरडिया, कमलेश चोरडिया, निलेश चोरडिया या पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधात्मक कायद्यासह भारतीय न्याय संहिता 189 (2), 191(2), 190, 115 (2), 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles